मुंबई : कांद्याला योग्य भाव महाराष्ट्रात मिळत नाही, असा आरोप वारंवार केला जातो. कवडीमोल भावाला कांदा विकण्याची हतबल परिस्थिती राज्यातल्या शेतक-यांवर ओढावते. महाराष्ट्रात १५० ते २०० रुपये क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. मात्र बिहार, उत्तर प्रदेशात कांद्याला महाराष्ट्राच्या तुलनेत तगडा भाव मिळत आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ५.६१ टक्के कांदा उत्पादन बिहारमध्ये केले जाते. बिहारमध्ये कांद्याला १००० ते १६०० रुपये भाव मिळत आहे. उत्तर प्रदेशातही बरा भाव कांद्याला मिळत आहे. केरळमधील एका बाजारात तर कांद्याला ४५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.
बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील ठाकुरगंज बाजारत १५ मे रोजी किमान १८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर २१०० ते २००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल दर तिथल्या शेतक-यांना मिळाला. महाराष्ट्रात ट्रेडर्स लॉबी मजबूत असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जात आहे. शेतक-यांचे नुकसान होत असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले यांनी म्हटले