17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतपाहणी दोऱ्यात पवारांनी ऐकल्या शेतक-यांच्या व्यथा

पाहणी दोऱ्यात पवारांनी ऐकल्या शेतक-यांच्या व्यथा

एकमत ऑनलाईन

तुळजापुर : तुळजापूर तालुक्यात देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी रविवारी (दि.१८) सकाळी ९.२० वाजता आले. यावेळी येथील नळदुर्ग रोडवरील हँलीपॅड येथे हेलीकाँप्टरने आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तुळजापूर तालुक्यातील कांक्रबा शिवारातील सोपान माळी, सचिन माळी, शहाजी रोचकरी, अच्युत माळी, लक्ष्मण साठे या शेतक-यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पहाणी केली.

यावेळी खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मा आ.राहुल मोटे, जिवनराव गोरे, संजय निंबाळकर, अमित शिंदे, संपतराव डोके, प्रतापसिंह पाटील, मेहबुब शेख, सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी स्वागत केले. यावेळी अनिल शिंदे, धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, अमर चोपदार, गणेश नन्नवरे, शरद जगदाळे, संदीप गंगणे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसान झालेल्या शेती पिकाची माहिती खा. पवार यांना दिली. यावेळी पुढा-यांना बाजुला खा. पवार यांनी शेतक-यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतक-यांनी पवार यांच्यासमोर टाहो फोडला. एकतर संसर्गजन्य रोगामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. आता आमच्या शेतातील पिकाचा हातातोडांशी आलेला घास हिरावून नेहला. पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ मदत दिली पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारकडून ताबडतोब मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, तलाठी, ग्रामसेवक, सरंपच काक्रंबा शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहारा शहरातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी खा. पवारांकडे मांडली व्यथा
तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त तालुक्याला भेट देण्यासाठी रविवारी (दि.१८)राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे लोहारा आले होती. यावेळी त्यांना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेतक-यांनी सोयाबीन पिकासह शेतीचे नुकसान झाल्याबाबत व्यथा मांडल्या.

याप्रसंगी शहरातील शेतक-याच्या वतीने ऐनोंदींन सवार, शिवण काटगावे, रफिक शेख, श्रीनिवास माळी, शंकर जट्टे, अब्बास शेख आदींनी सडलेले सोयाबीन, फळधारण न झालेल्या फळांची झाडे दाखवून आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान ऐनोंदींन सवार या शेतक-यांनी तालुक्यातील झालेली अतिवृष्टी ही भूकंपानंतरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगून भूकंपामध्ये आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे हुभे होता. याही नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी शेतक-यांना खा. शरद पवार यांनी घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द दिला. यावेळी लोहारा शहरातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यकर्त्याची गर्दी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन
उमरगा तालुक्यातील कवठा येथे खा. शरद पवार यांच्या पाहणी दौ-यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी गर्दी केली होती. पवारांच्या आगमनामुळे कार्यकर्तयामध्ये उत्साह दिसत होता. कोविड १९ च्या धरतीवर सर्वत्र लॉकडाऊन असूनही कोणीही नियम पाळताना दिसत नव्हते. रोडवरुन तेरणा नदीच्या पश्चिमेकडील पिकांची पाहणी करुन पूर्वेकडील बाजूंच्या पिकांची पाहणी करण्यासाठी येताना खा. पवार यांना या गर्दीमुळे सुरक्षा व्यवस्था चोख असूनही अडचणीचा सामना करावा लागला.

नुकसानग्रस्त झालेल्या भागाची आ. पाटील यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या