37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeउद्योगजगतमारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ

मारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आजपासून म्हणजेच १८ एप्रिलपासून कार घेणे महाग झाले आहे. किंमत वाढवण्यामागचे कारण म्हणजे इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने मार्जिन परिणाम होतो आहे; त्यामुळे किंमत वाढवल्याचं मारुती सुझुकी कंपनीचे म्हणणे आहे. खरेतर मध्यम वर्गाच्या पसंतीच्या गाड्या म्हणून मारुती सुझुकीच्या गाड्या ओळखल्या जातात. परंतु याबाबत स्वत: मारुती सुझुकीनेच १८ एप्रिलपासून सर्व मॉडेल्सच्या किंमती सरासरी १.३% ने वाढवल्या जात असल्याचे सांगितले आहे.

मारुती सुझुकी कंपनीने अगोदरच म्हणजे ६ एप्रिल रोजी दरवाढीची घोषणा केली होती. याआधी १ एप्रिलपासून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनीही आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. त्याच वेळी, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५% पर्यंत वाढवल्या आहेत.

मॉडेलनुसार किमतीत वाढ
मारुती सुझुकीने जारी केलेल्या निवेदनानुसार किमतीत वाढ झाल्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या महिन्यात वाहनांच्या किमती वाढवणार आहे. प्रत्येक मॉडेलनुसार वाहनांच्या किमती वाढवल्या जातील. गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या