25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeउद्योगजगतआरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड

आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ठोठावला तीन कोटींचा दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसी बँकेने काही निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. १ जुलै २०१५ रोजी बँकांकडून जारी केलेल्या वर्गीकरण मूल्यमापन आणि गुंतवणूक पोर्टफोलिओच्या काही निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीआयसीआय बँकेला ३ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नियामक टप्प्यातील त्रुटींमुळे हे पाऊल उचलण्यात आले असून, बँकेच्या ग्राहकांशी कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या मान्यतेचा निर्णयावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. माहिती देताना आरबीआयने म्हटले आहे की, सिक्युरिटीज एका कॅटेगरीतून दुसºया प्रकारात बदलल्या गेल्या असून, या प्रक्रियेत केंद्रीय बँकेच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. नियमांचे पालन करण्यात चूक केल्याबद्दल त्यांच्यावर दंड का लावला जाऊ नये, याचे कारण नोटिशीच्या माध्यमातून विचारण्यात आले होते. नोटिशीच्या उत्तरात बँकेचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर आरबीआयच्या वैयक्तिक सुनावणीला त्यांनी तोंडी प्रतिक्रिया दिल्यानंतर रिझर्व्ह बँक कारवाईच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याचा बँकेवर करण्यात आलेला आरोप खरा आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असा ठपकाही आरबीआयने ठेवला आहे.

समन्सविरोधात रश्मी शुक्ला उच्च न्यायालयात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या