मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेने खुल्या बाजारात सरकारी रोखे खरेदी आणि विक्री करणार असल्याचे जाहीर केले. या रोख्यांची किंमत एकूण २० हजार कोटी रुपये असणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक २० हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांचा व्यवहार दोन टप्प्यात करणार आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा २७ ऑगस्ट २०२० ते ३ सप्टेंबर २०२० दरम्यान लिलाव करणार आहे. सध्याच्या बाजारातील स्थितीचा आणि चलन तरलतेचा आढावा घेण्यात आला आहे.
त्यानंतर आरबीआयने एकाचवेळी सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात (ओपन मार्केट ऑपरेशन) खरेदी व विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हे २० हजार कोटींचे व्यवहार प्रत्येकी १० हजार कोटींच्या टप्प्यात होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. केंद्रीय मध्यवर्ती बँक चलनाच्या तरलतेच्या स्थितीचा आणि बाजाराच्या स्थितीचा आढावा घेत राहणार आहे. वित्तीय बाजारपेठेतील कामकाज सुरळीत चालण्यासाठी योग्य उपाययोजना करणार आहे.
तिघांनी मिळून एकाचा खून केला : खारी बिस्कीटे आणि बटर विकण्यावरून वाद