22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उद्योगजगत मंदीचा फटका: फ्युचर ग्रुपच्या ताब्यात घेण्याची रिलायन्सची तयारी

मंदीचा फटका: फ्युचर ग्रुपच्या ताब्यात घेण्याची रिलायन्सची तयारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : फ्युचर ग्रुप असे म्हटल्यावर आपल्याला सर्वसामान्य माणूस म्हणून लवकर काहीच लिंक लागत नाही. मात्र, बिग बाजार, ईजीडे क्लब आणि ब्रांड फैक्टरी असे ब्रँड ऐकल्यावर लगेचच काहीतरी क्लिक होते. होय, रिटेल मार्केटमधील हे सर्व मोठे ब्रँड आहेत. आपण खरेदी करीत असलेल्या या दुकानांना करोना व आर्थिक मंदी यांचा फटका बसला आहे. त्यामुळे फ्युचर ग्रुपचा भाग असलेले हे ब्रँड आता रिलायन्सच्या ताब्यात जाणार आहेत.

आता बिग बाजार, ईजीडे क्लब आणि ब्रांड फैक्टरी हे ब्रँड रिलायन्सच्या मालकीची होण्याची शक्यता

सुप्रसिद्ध उद्योजक किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपचा भाग असलेले हे रिटेलिंग स्टोअर आता त्यांच्याकडून सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडे जाणार आहेत. इकॉनॉमिक टाईम्स या आर्थिक वृत्तपत्राने आपल्या ऑनलाइन आवृत्तीमध्ये ही ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता बिग बाजार, ईजीडे क्लब आणि ब्रांड फैक्टरी हे ब्रँड रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपची ओळख असलेले ब्रँड जात असल्याने या ग्रुपचे ‘फ्युचर’च विकले जाणार असल्याची भावना अनेकांची आहे.

व्यवसायाला रिलायन्सच्या ताब्यात देण्यासाठीच्या बैठका अंतिम टप्प्यावर

बातमीत म्हटले आहे की, रिटेल कारोबार आणि सप्लाई चेन अशा सर्व व्यवसायाला रिलायन्सच्या ताब्यात देण्यासाठीच्या बैठका अंतिम टप्प्यावर आलेल्या आहेत. बियाणी यांच्याकडे व्यवस्थापन ठेऊन त्यांना रिलायन्सच्या बोर्डमध्ये सहभागी करून देण्याच्या मुद्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. सध्या फ्युचर ग्रुपकडे असेलेल्या एकूण संपत्तीची किंमत १०,४६४ कोटी रुपये आहे. तर, त्यांच्याकडे १२,००० कोटी रुपये यापेक्षाही जास्त कर्ज आहे. या ग्रुपचे व्हॅल्युएशन (बाजार मूल्य) सुमारे 74 टक्के इतके घसरले आहे. कोविड १९ च्या आपत्कालीन परिस्थितीत हा ग्रुप आणखी संकटात सापडल्याने ही डील रिलायन्ससाठी सुकर बनलेली आहे.

‘रिलायन्स’ची नजर ‘फ्युचर’वर; रिटेल हिस्सा वाढवून मोठी उडी घेण्याची तयारी

सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या व्यवसायाचा वारू आता वेगाने धावत आहे. जिओ या प्लॅटफॉर्मवर मोठी गुंतवणूक आल्याने आता रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. त्याच कंपनीने आता रिटेल मार्केटमधील आपला हिस्सा वाढवण्यासाठी मोठा ‘फ्युचर’ प्लॅन केला आहे. होय, किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपच्या रिटेल बिजनेसला ताब्यात घेण्याची तयारी रिलायन्सवाल्यांनी केली आहे.

त्यानुसार ही चर्चा आता प्राथमिक टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर गेल्याची बातमी इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने दिली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, फ्युचर ग्रुपच्या बग बाजार, ईजीडे क्लब आणि ब्रांड फैक्टरी या सर्व ब्रांडला ताब्यात घेण्याची तयारी अंबानींनी केली आहे. ऑनलाईन आणि आता ऑफलाईन मार्केटमधील आपला रिटेल हिस्सा वाढवून मोठी उडी घेण्याची तयारी रिलायन्सने केली आहे.यामध्ये बियाणी यांच्याकडेच व्यवस्थापन ठेऊन हा हिस्सा खरेदी करण्याची तयारी अंबानींनी केलेली आहे. एकूणच या डीलकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण, असे झाल्यास त्याचा बाजारावर मोठा परिणाम दिसेल.

Read More  पुन्हा आक्रमक : माझी जेलमध्ये जाण्याची तयारी -प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या