मुंबई : रिलायन्स (एडीए) समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. अनिल अंबानी यांच्याविरुद्ध पाठवलेल्या नोटीसवर २० फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश आयकर विभागाला दिले आहेत.
तसेच या याचिकेतून अंबानी यांनी साल २०१५ च्या कायद्यालाच आव्हान दिले असल्याने पुढील सुनावणीस देशाचे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.