23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home उद्योगजगत जेनेलियासमवेत रितेश बनविणार "शाकाहारी मीट'

जेनेलियासमवेत रितेश बनविणार “शाकाहारी मीट’

मुंबई : बॉलीवूड मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो आपल्या चित्रपट किंवा अभिनयाविषयी सतत चर्चेत असतो. आत तो नवीन क्षेत्रात पाऊल ठेवत असून त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसोझाही काम करणार आहे. सध्या, करोना विषाणूमुळे मांसाहाराबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आता रितेश आणि जेनेलिया निराकरण करणार आहेत.

रितेश देशमुखने एक ट्‌विट करत याबाबत माहिती दिली आहे. रितेशने लिहिले, ‘Nice to MEAT you. @ImagineMeats.या पोस्टवर चाहते अनेक कमेंटस्‌ करत आहेत. हे ऐकून किती स्वादिष्ट वाटत आहे, अशी कमेंट एकाने पोस्ट केली. तर अन्य एकाने आम्ही याची आतुरतेने वाट पाहात आहोत, असे सांगितले. विशेष म्हणजे हे मांसाहारी दिसणारे पदार्थ शाकाहारी आहे.

दरम्यान, रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. या दाम्पत्यांना दोन मुले असून जेनेलिया संपूर्ण कुटुंबावर लक्ष्य देत असते. दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असतात. जेनेलिया आपल्या मुलांबरोबर इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर करत असते.

View this post on Instagram

Nice to MEAT you… @imaginemeats

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

Read More  आजी योद्धा…….अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी शेअर केला व्हिडिओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow