मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५४,८५० कोटी आहे. तर या यादीत ‘द बायोकॉन’च्या किरण मजुमदार शॉ ३६,६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसºया स्थानावर आहेत.
रोशनी नाडर मल्होत्रा या एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक आणि सीईओ पदावर आहेत. यासोबतच एचसीएल टेक्नोलॉजीज बोर्डाच्या उपाध्यक्ष आणि शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्तही होत्या. ३८ वर्षीय रोशनी नाडर मल्होत्रा, एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर यांच्या कन्या आहेत. यंदा जुलै महिन्यात आयटीमधील अव्वल कंपनी असलेल्या एचसीएलने घोषणा केली होती, अध्यक्ष शिव नडार पद सोडायचे आहे. यानंतर शिव नाडर यांनी आपल्या साम्राज्याची धुरा रोशनी नाडर यांच्यावर सोपवली होती.
आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता