30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउद्योगजगतरविवार दुपारपर्यंत 'आरटीजीएस' सुविधा बंद

रविवार दुपारपर्यंत ‘आरटीजीएस’ सुविधा बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात मागच्या काही वर्षांपासून डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र आज या डिजिटल व्यवहाराचा फटका आरटीजीएस सेवेला बसला असून, रविवार दुपारी २ वाजेपर्यंत सदर सेवा बंद राहणार आहे़ कोरोनामुळे तर डिजिटल व्यवहारांवरच भर दिला जात आहे. तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ही बातमी महत्वाची आहे. ज्यांना आरटीजीएस करायचे असेल त्यांनी आज रात्री १२ पर्यंत करून घ्या. अन्यथा पुढचे १४ तास व्यवहार बंद राहणार आहे.

दि. १७ रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या दि. १८ च्या दुपारी २ पर्यंत सलग १४ तास आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे.
याबाबत रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, १७ एप्रिल २०२१ या दिवसातील कार्यकाळ संपल्यानंतर ही सुविधा बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी १४ डिसेंबर २०२० रोजी २४ तासांसाठी ही सुविधा बंद करण्यात आली होती. आरटीजीएस म्हणजे रियल टाईम गॉस सेटलमेंट म्हणजे जलद गतीने केलेला ऑनलाइईन व्यवहार. भारत हा देश २४ तास आरटीजीएस सुविधा देणा-या महत्वाच्या देशांपैकी एक आहे.

महाराष्ट्राचा औषध पुरवठा रोखला? नवाब मलिक यांचा आरोप; भाजपचे प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या