28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeउद्योगजगतकोरोना काळातही ऑटोमोबाईल क्षेत्राची दमदार वाढ

कोरोना काळातही ऑटोमोबाईल क्षेत्राची दमदार वाढ

एकमत ऑनलाईन

केप टाऊन : कोरोनाच्या संकटकाळात बाजारपेठा मंदीत असतानाही भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राने दमदार कामगिरी केली आहे. वर्ष २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कंपन्यांच्या वाहनांची निर्यात झाली आहे. वाहन उद्योगाबाबतच्या नुकत्याच आलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वाहन बाजारपेठेच्या व्यासपीठावरील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री एक्सपोर्ट काऊन्सिलच्या ऑटोमोटिव्ह एक्सपोर्ट मॅन्युअल अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालात म्हटले आहे की, जगातील अनेक नामांकित वाहन उत्पादकांनी भारताला एंट्री ग्रेड आणि छोट्या वाहनांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवले आहे. भारतातून दक्षिण आफ्रिकेत आयात करण्यात आलेली बहुतांश वाहने याच श्रेणीतील आहेत. या श्रेणीतील फोक्सवॅगनची छोटी कार पोलो ही एकमेव अशी कार आहे, ज्या कारची निर्मिती दक्षिण आफ्रिकेत केली जात होती. या अहवालानुसार २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतातून ८७,९५३ वाहने आयात केली आहेत. आयात करण्यात आलेल्या वाहनांत एकूण प्रवासी कार आणि हलक्या व्यावसायिक वाहनांचे प्रमाण ४३.२ टक्के इतके आहे.

दक्षिण आफ्रिकन नागरिकांना पिकअप वाहने चालवायला आवडतात. यामध्ये दोन्ही प्रकारच्या वाहनांची सुविधा आहे, त्यात व्यावसायिक आणि दूरस्थ सहलीसाठी उपयुक्त अशा वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका भारताकडून मोठ्या प्रमाणात पिकअप वाहने आणि छोट्या कारची आयात करतो. महिंद्राचे (दक्षिण आफ्रिका) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुप्ता यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. भारत-दक्षिण आफ्रिका संबंध दिवसेंदिवस अधिक बहरत आहेत. केवळ दोन देशांमधील परस्पर व्यापारच वाढत नाही तर दक्षिण आफ्रिका हा देश आफ्रिका खंडातील अन्य बाजारांमधील भारतीय वस्तूंसाठीचे प्रवेशद्वार म्हणून उदयास येत आहे. स्थानिक बाजारात तीन वर्षांपासून सर्वाधिक वेगाने विक्री करणा-या वाहनांमध्ये महिंद्राची पिकअप वाहने आघाडीवर आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले.

पुण्यात पोलिस निरीक्षकाच्या आईची हत्या; सलग पाचवा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या