32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeउद्योगजगतहिंडेनबर्गवर शुक्रवारी ‘सर्वोच्च’ सुनावणी

हिंडेनबर्गवर शुक्रवारी ‘सर्वोच्च’ सुनावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग रिपोर्टवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार, वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होईल. त्यात या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या निगराणाखील एक समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकिलांनी हे प्रकरण सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे तातडीने मांडण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारात सकाळपासूनच विक्रीचा ट्रेंड दिसून आला. सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीही किंचित घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १० वर, तर २० खाली आहेत. बाजारातील या घसरणीचा परिणाम अदानी समूहाच्या समभागांवरही दिसून येत आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज १० टक्क्यांनी घसरला आहे.

काल १० पैकी ६ शेअर्स वाढीसह बंद झाले
काल ८ फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे १० पैकी ६ शेअर्स वाढीने बंद झाले. तर ४ समभागांनी घसरण नोंदवली. अदानी एंटरप्रायझेसमध्ये २३% तेजी दिसून आली. तर अदानी पोर्ट्सचे शेअर्सही ९% वर चढले. २४ जानेवारीला ंिहडेनबर्ग रिचर्सचा अहवाल आल्यानंतर या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली. गत शुक्रवारी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १००० रुपयांच्या जवळ पोहोचला होता.

कर्जाची मुदतपूर्व परतफेड करणार
अदानी समूह ४००० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करणार आहे. अदानी समूह आपल्या डोक्यावरील ५०० दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे ४००० कोटी रुपये) कर्ज मुदतपूर्व फेडण्याची तयारी करत आहे. समूह पुढील महिन्यात असे करण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने गतवर्षी होल्सिम लिमिटेडची सिमेंट असेट्स खरेदी करण्यासाठी ४.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते.

हायड्रोजन पार्टनशिप होल्डवर
फ्रान्सच्या टोटल एनर्जीने अदानी समूहासोबत हायड्रोजन पार्टनरशिप तूर्त होल्ड केली आहे. हिंडेनबर्गचे आरोप व मूल्यांकनाच्या मागणीमुळे हा प्रोजेक्ट थंड बस्त्यात टाकण्यात आला आहे. एमएससीआयने अदानी समूहाचा फेरआढावा घेतल्याची चर्चा आहे. ही गोष्ट समूहासाठी नकारात्मक मानली जात आहे. एमएससीआय इंडेक्सचे ८ शेअर्स आहेत. टरउक अदानी समूहाच्या शेअर्सचे वेटेज कमी करण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या