24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउद्योगजगतकोणत्याही अटीशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा - विजय मल्ल्या

कोणत्याही अटीशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा – विजय मल्ल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : सार्वजनिक बॅंकांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या भारतातून फरार झाला त्याच्या मुसक्‍या आवळण्याच प्रयत्न मोदी सरकारने केला असला तरी तो अजूनही हाती लागत नाही. र्बंकाकडून कर्जे घेऊन काहीजण देशाबाहेर पळून गेले आहेत त्यामध्ये मल्ल्याही आहे.

सामान्यांच्या पैशावर डल्ला मारणारे मल्ल्यासारखे बदनाम उद्योगपती कारवाईच्या भितीने आता सरकारला खाल्लेले पैसे परत करण्याची तयारी दाखवित आहेत याबाबतही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Read More  २० हजार बसेस पडून असतानाही मजुरांची पायपीट का? प्रियंकांचा योगी सरकारला प्रश्न

कोरोनाचे संकट अद्याप संपले नाही. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मोदी सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतानाच आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली तसे वीस लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केले. मोदींच्या या पॅकेजचे स्वागत मल्ल्या यांने केले आहे.

सरकार इच्छा असेल तर आवश्‍यक तितक्‍या नोटा छापू शकते. पण, सार्वजनिक बॅंकांचं १०० टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणाऱ्याकडे सतत दुर्लक्ष केलं पाहिजे का ? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थीशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा,असं विजय मल्ल्या यानं ट्विट करून म्हटलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या