22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उद्योगजगत टीसीएस देणार देशातील ४० हजार जणांना रोजगार

टीसीएस देणार देशातील ४० हजार जणांना रोजगार

एकमत ऑनलाईन

बेंगळुरू : कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या संकट काळातील सर्वात चांगली बातमी आता समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार असल्याची योजना तयार केली आहे.

टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे. अमेरिकेतील हे दोन प्रकारचे व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे.

कोरोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंड लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजारांच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसºया सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल.

ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा
टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा संदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा होता. याचा काही काळ प्रभाव पडेल. या निर्णयामुळे कर्मचा-यांत अनिश्चितता आणि नाराजी आहे.

गतवर्षीही केली होती नोकरभरती
टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला आॅनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यांपैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.

Read More  सारस अ‍ॅग्रो कंपनी विरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या