17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतई-फायलिंग पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी सुरूच

ई-फायलिंग पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी सुरूच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात प्राप्तीकर विभागाने नवे ई-फायलिंग पोर्टल सुरू केले आहे. पहिल्या दिवसापासूनच करदात्यांना या पोर्टलवर काम करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. आठवड्याभरात पोर्टल सुरळीत काम करेल असेल पोर्टल तयार करणाºया इन्फोसिस कंपनीने म्हटले होते. मात्र अजूनही पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी कायम आहेत, असे बºयाच करदात्यांनी सांगितले.

पोर्टलवर काम करताना आवश्­यकतेपेक्षा पेक्षा जास्त वेळ लागत आहे. पोर्टल कडून प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर पोर्टलमधील अनेक वैशिष्टय कार्यरत नाहीत, असा अनुभव अनेक करदात्यांना आला आहे. ७ जून रोजी हे नवे पोर्टल सुरू करण्यात आले. जुन्या पोर्टलपेक्षा नवे पोर्टल अधिक कार्यक्षमरित्या काम करेल, करदात्यांना विवरण लवकर भरता येईल, त्याचबरोबर कर परतावा लवकर मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र पोर्टल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या.

त्या अडचणी शक्­य तितक्­या लवकर सोडवाव्या असे स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगितले होते. इन्फोसिस कंपनीने आठवड्यावर यामध्ये पोर्टलमधील सर्व बाबी सुरळीतपणे चालतील असे सांगितले होते. मात्र अजूनही पोर्टलवर काम करताना तांत्रिक अडचणी कायम आहेत, असे करदात्यांनी सांगितले.

स्पुटनिक व्ही बाजारात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या