25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeउद्योगजगतटेस्लाचे देशात आगमन

टेस्लाचे देशात आगमन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील श्रीमंत असणारे एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाची भारतात एन्ट्री झाली आहे. त्यांनी टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रजिस्टर केले आहे. कंपनी येथे लक्झरी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि व्यापार करणार आहे. टेस्लाचे पहिले ऑफीस बंगळूरूमध्ये होणार आहे. ते बंगळूरमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट युनिट सुरु करणार आहेत. येथे संशोधन व विकास युनिटद्वारे ती आपल्या ऑपरेशनची सुरूवात करणार आहे. यावर मनसेच्या संदिप देशपांडे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर ट्विट करुन टीका केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी ‘टेस्ला’चे स्वागत केले. टेस्ला कंपनीने ८ जानेवारीला बंगळूरमध्ये कंपनीची नोंदणी केली आहे. त्यांचा नोंदणी क्रमांक १४२९७५ आहे. वैभव तनेजा, व्यंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेनस्टाईन हे कंपनीचे संचालक आहेत. तनेजा हे टेस्लामध्ये सीएफओ आहेत. तर फेन्स्टाईन टेस्ला येथे ट्रेड मार्केट येथे ग्लोबल ट्रेड डायरेक्टर आहेत. कंपनी मॉडेल ३ भारतात लाँच करू शकते. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात वितरण सुरू होऊ शकते. अस कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने म्हटले आहे.

टेस्लावरून मनसेची आगपाखड
टेस्लाच्या आगमनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे)चे संदिप देशपांडे यांनी सूचक ट्विट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टोला मारला आहे़ टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज ३ मंत्र्यांना झटका बोलाची कढी बोलाचा भात असे म्हटले आहे.

लसीवर विश्वास नसल्यास पाकिस्तानात जा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या