21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeउद्योगजगत5 जी स्पेक्ट्रमसाठी चौथा अर्ज अदाणींचाच

5 जी स्पेक्ट्रमसाठी चौथा अर्ज अदाणींचाच

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी हे दोघे उद्योगपती गुजरातचे आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. दोघांमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र अदाणी आणि अंबानी यांच्यात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात थेट स्पर्धा होणार असे चित्र आहे.

दूरसंचार विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार स्पेक्ट्रमच्या हक्कांसाठी 5 जी लिलावात सहभागी होण्यासाठी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम, व्होडाफोन आयडिया लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.

दरम्यान 5जी लिलाव २६ जुलैपासून सुरू होणार आहे. लिलावातील विजेत्याला २० वर्षे स्पेक्ट्रम वापरण्याचा अधिकार मिळणार आहे. सरकार एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. त्याची किंमत सुमारे ४.३ लाख कोटी रुपये आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या