27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeउद्योगजगतगुंतवणुकीचा ट्रेंड बदलतोय; गोल्ड ईटीएफना वाढती पसंती

गुंतवणुकीचा ट्रेंड बदलतोय; गोल्ड ईटीएफना वाढती पसंती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इक्विटीवर आधारित गुंतवणुकीला आणि अन्य गुंतवणूक साधनांना फटका बसत असतानाच एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफवर सर्वाधिक विश्वास टाकल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Read More  चीनसोबतचे सर्व संबंध तोडणार

म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असणाºया असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात अ‍ॅम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर, मार्च महिन्यात याच फंडांतून १९५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढूनही घेण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२०मध्ये या फंडांमध्ये अनुक्रमे २०२ कोटी रुपये आणि १४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचेही दिसून आले आहे. तत्पूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९मध्ये गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये अनुक्रमे ७.६८ कोटी रुपये आणि २७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आॅक्टोबर २०१९मध्ये याच फंडांतून मागणीअभावी गुंतवणूकदारांनी ३१.४५ कोटी रुपये मागेही घेतले होते.

एप्रिल महिन्यातही गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक होत आहे, याचा अर्थ असा की गुंतवणूकदार अजूनही सोन्याची खरेदी करीत आहेत. इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणावर मंदी दिसून आल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित साधनाते गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. सध्याच्या अस्थिरतेच्या बाजारात सोन्याशिवाय सुरक्षित गुंतवणूक दुसरी कोणतीही असल्याचे दिसून येत नाही, अशी माहिती ग्रो अ‍ॅपचे सहसंस्थापक हर्ष जैन यांनी दिली.

Read More  लातूर शहरात मुंबईहून आलेले २ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तर जिल्ह्यात ४ वाढले

जैन यांच्यासारखेच मत मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक हिमांशू श्रीवास्तव यांनी नोंदवले. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था आणि जगभरातील शेअर बाजारांची दैना उडाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातच सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार त्यामध्ये प्रॉफिट बुकिंगची संधीही शोधत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच आॅक्टोबर २०१९मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून ३१ कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेतली आणि मार्च २०२०मध्ये १९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हल्ली बºयाच सजग गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक आवश्यक वाटते. सोन्याच्या पोर्टफोलिओतील समावेशामुळे त्याला स्थिरता लाभते आणि सध्याच्या अस्थिर वातावरणात सोने चांगला परतावा मिळवून देण्यास ते समर्थ असल्याचे वाटते.

सेफ हेवनमुळे गुंतवणूकदारांची पसंती
सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणारÞ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२०च्या अखेरीस या फंडांमध्ये एकूण ७,९४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याची वाढती अस्थिरता पाहता आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. मंदी आणि अस्थिरता असूनही एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये ४६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मार्च २०२०मध्ये सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांमधून २.१३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी घेण्यात आली होती.

२४ लाख कोटींचा निधी
मंदी आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ४४ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या माध्यमातून एप्रिल २०२०अखेर एकूण मत्ता २४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मार्च २०२०अखेर ही मत्ता एकूण २२.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या