मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात चांगली वाढ झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी (सेन्सेक्स-निफ्टी) वाढीसह बंद झाले.
दिवसभराचा व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ४३३.३० अंकांच्या म्हणजेच ०.८२ टक्क्यांच्या वाढीसह ५३,१६१.२८ वर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांक १३२.८० अंकांच्या म्हणजेच ०.८५ टक्क्यांच्या वाढीसह १५,८३२.०५ वर बंद झाला. आज ३ शेअर्समध्ये घसरण झाली. त्यात कोटक बँकेची सर्वांत मोठी घसरण झाली.