मुंबई: गेल्या आठवड्यातील पडझडीनंतर आता या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स १८० अंकांनी वधारला तर निफ्टीही ६० अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये ०.३४ टक्क्यांची वाढ होऊन तो ५२,९७३ वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये ०.३८ टक्क्यांची वाढ होऊन तो १५,८४२ वर पोहोचला आहे.
आज २१८० कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर ११३८ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. १७२ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना कॅपिटल गुड्स, ऑटो, उर्जा, रिअॅलिटी, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये १-३ टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी आणि एफएमजीसी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचे दिसून आले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही १ टक्क्याची वाढ झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात चांगली
जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स २०२.३४ अंकानी वधारला. सेन्सेक्स ५२,९९५.९६ अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकात ६२ अंकानी वाढ झाली.