नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारी केंद्र सरकारकडून बजेट मांडले जाणार असल्यचाी माहिती केंद्रसरकारमधील अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात अर्थसंकल्प मोडण्यात येणार आहे,असे खात्रीलायक सुत्रांकडून समजते आहे. तर दुस-या सत्राचा कालावधी ८ मार्च ते ८ एप्रिल असा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प मनमोहनसिंग सरकारच्या काळापर्यंत १ एप्रिलला जाहीर केला जात असे मात्र मोदी सरकार सत्तारुढ झाल्यापासून अर्थसंकल्प मांडण्याची तारीख १ फेब्रुवारीपर्यंत अलीकडे आणण्यात आली आहे. विविध विभागांना पैसा खर्च करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी तारीख अलीकडे आणण्यात आल्याचे मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते.
मोदींच्या हट्टापायी ६० शेतक-यांनी जीव गमावला