लावा कंपनी चीनमधील आपला काशागोशा गुंडाळणार
नवी दिल्ली – चीनमधील आपला काशागोशा गुंडाळण्याचा निर्णय मोबाईल उत्पादक कंपनी ‘लावा’ने घेतल्याची माहिती लावा इंटरनॅशनलकडून देण्यात आली. कंपनीने भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी कंपनीने पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More कोरोना संकटातून राष्ट्रवादाला बळकटी
चीनमध्ये उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात आमचे कमीतकमी ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. हे काम आम्ही आता भारतात नेले आहे. भारतातीलच कारखान्यातून उत्पादनांच्या विक्रीची आवश्यक ती गरज पूर्ण केली जाईल. यापूर्वी आम्ही चीनमधून आमचे फोन जगभरात वितरित करत होतो. पण आम्ही ते आता भारतातून वितरित करणार असल्याची माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे.
आम्ही लॉकडाउनच्या कालावधीदरम्यान निर्यातीची मागणी चीनमधून पूर्ण केली. आता आपण चीनला मोबाईल निर्यात केला जावा हे माझे स्वप्न आहे. यापूर्वीपासूनच चीनला भारतीय कंपन्या मोबाईल चार्जर निर्यात करत आहेत. कंपनीच्या स्थितीतही उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना बदल घडवेल. यासाठी आता संपूर्ण व्यवसाय भारतातूनच केला जाईल, असे राय यांनी म्हटले आहे