मुंबई : गेल्या 24 तासात सोन्याचा भाव तब्बल 3 हजार रुपयांनी वाढला आहे. मुंबईतील सोन्याचा भाव 54 हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 54 हजार 828 रुपये प्रतितोळा इतका आहे.
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पुण्यात सोन्याचे आजचे दर 54 हजार तोळ्यापर्यंत गेले आहेत. तर चांदीचे दर 70 हजार किलोपर्यंत पोहोचले आहेत.
वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे. गेल्या दीड वर्षातील सोन्याची सर्वात मोठी दरवाढ आहे, तर गेल्या चार महिन्यात चांदीचे दर दुप्पट झाले असल्याची माहिती रांका ज्वेलसर्च संचालक वस्तूपाल रांका यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोने चांदीचे दरवाढीवर परिणाम होत असल्याचंही वस्तूपाल रांका यांनी सांगितलंय.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरु झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.
Read More नव्या सातबाऱ्यामध्ये होतील हे 11 मोठे बदल