36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउद्योगजगतअर्थव्यवस्था पुन्हा सुधारणेच्या दिशेने

अर्थव्यवस्था पुन्हा सुधारणेच्या दिशेने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे उतरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेला दसरा आणि दिवाळीने चांगलाच हात दिला आहे. अनलॉक प्रक्रियेत हळूहूळ बाजारपेठा उघडण्यावर भर दिल्याने वस्तू आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातच ऑनलाइन रिटेल विक्री आणि अन्य व्यवसायांत वाढ नोंदवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत आहे.

अ‍ॅमेझॉन,फ्लिपकार्टच्या विक्रीत ५५ टक्के वाढ
सणासुदीच्या काळात ऑनलाइन रिटेल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सणांदरम्यान अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विक्रीमध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ५५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. रेडसीरच्या अहवालानुसार १५ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ३०,००० कोटी रुपयांच्या (जवळपास ४.१ अब्ज डॉलर) उत्पादनांची विक्री केली.

नवीन वाहनांच्या नोंदणीत वाढ
सणासुदीत वाहनांच्या विक्रीत व नोंदणीतही वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (फाडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये १४.१ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टरपासून प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली आहे.

उत्पादन, सेवा क्षेत्रात सुधारणा
करवसुली, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातही सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. ही तिन्ही क्षेत्रे रोजगारवाढीसाठी कारणीभूत ठरतात. या तीन क्षेत्रांची देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास ६० टक्के हिस्सेदारी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास २४ टक्के घसरण नोंदविण्यात आली होती.

क्रेडिट कार्ड व्यवहारांत वाढ
रिटेल विक्रीत वाढ होण्याबरोबरच क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये ८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२०मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १४.२८ कोटी व्यवहार झाले. याशिवाय स्मार्टफोन विक्रीतही मोठ्या प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पच्या आकडेवारीनुसार चालू वर्षाच्या तिस-या तिमाहीतील स्मार्टफोन विक्रीत देश जागतिक पातळीवर तिस-या क्रमांकावर होता.

रोजगारांमध्येही सुधारणा
अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ होण्याबरोबरच नोक-यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळेच ऑगस्टमध्ये बेरोजगारी दरात सुधारणा दिसून आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर ६.९८ टक्के होता. मात्र, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडल्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रोत्साहन पॅकेजमुळे फायदा
विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने गुरुवारी घोषित केलेल्या २.६५ लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळण्याची शक्यता आहे. यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या अर्थतज्ज्ञ तान्वी गुप्ता यांच्या मते बहुतांश भारतीय कंपन्यांच्या ताळेबंदामध्ये किरकोळ वृद्धी नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या मध्यावधीत सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर मागणीत पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत दिसण्यास सुरुवात झाली आहे. जीएसटीमधून मिळणारे उत्पन्नही पुन्हा एक लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये सुधारणा होत आहेत. या शिवाय भांडवलावर आधारित उद्योगांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती एचएसबीसी होल्डिंग्जच्या चीफ इंडिया इकॉनॉमिस्ट प्रांजल भंडारी यांनी दिली.

‘रॉ’ ने ७०० दहशतवादी तयार केले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या