22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उद्योगजगत यूसी वेबने भारतातून गुंडाळला गाशा

यूसी वेबने भारतातून गुंडाळला गाशा

एकमत ऑनलाईन

अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडचा भाग असलेल्या यूसी वेबने भारतातील आपला व्यवसाय बंद करण्यास सुरूवात केली आहे. भारताकडून 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर यूसी वेबने हा निर्णय उचलला आहे. या 59 अ‍ॅप्समध्ये यूसी वेबचा देखील समावेश होता. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

कंपनी आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यास सुरूवात केली आहे. बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये अलीबाबा ग्रुपचे आणखी दोन अ‍ॅप आहेत.

यूसी वेब ब्राउजरसह व्हीमेट आणि यूसी न्यूज या अॅप्सने देखील भारतातील आपला व्यवसाय गुंडाळण्याची पुर्ण तयारी केली आहे. यूसी ब्राउजरने आपले गुरूग्राम आणि मुंबईमधील ऑफिस बंद केले आहे. 15 जुलैला कंपनीने पत्र लिहून सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे.

Read More  ….आराध्याला पिझ्जा खाण्याची ईच्छा झाली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या