24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतसॅनिटायझर उत्पादनात भारतात उत्तर प्रदेश आघाडीवर

सॅनिटायझर उत्पादनात भारतात उत्तर प्रदेश आघाडीवर

एकमत ऑनलाईन

उत्पादनात घेतली आघाडी  : राज्यात दररोज सरारारी २ लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन 
करोना साथीमध्ये दर दोन तासानी हात धुण्याचा अथवा सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला

उत्तर प्रदेश  : करोना मुळे जगातील उद्योग क्षेत्राची वाताहत झाली असताना सॅनिटायझर बाजार सतत चढता आलेख दाखवीत आहे. गेल्या काही दिवसात भारतात ५०० लहान मोठी सॅनिटायझर उत्पादन केंद्रे सुरु झाली असून उत्तर प्रदेशने सॅनिटायझर उत्पादनात आघाडी घेतली आहे. आज या राज्यात दररोज सरारारी २ लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन केले जात असून राज्याची गरज भागवून अन्य २३ राज्यात त्याचा पुरवठा केला जात आहे. त्यात हरियाना, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात हे सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात मागविले जात आहे असे समजते.

Read More  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप; शिक्षणमंत्र्यांची माहिती

सॅनिटायझर उत्पादनात ६४ टक्के वाढ
ऑल इंडिया डीस्टीलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार १५० हून अधिक आसवनी मध्ये अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर उत्पादनात ६४ टक्के वाढ झाली असून त्याला प्रचंड मागणी आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार ८५ साखर कारखाने, १२ डीस्टलरिज, ३७ कंपन्या, ९ अन्य संस्था मिळून रोज २ लाख लिटर सॅनिटायझर बनवीत आहेत. आत्तापर्यंत ४५ लाख लिटर हून अधिक उत्पादन झाले असून त्यातील २० लाख लिटर अन्य राज्यांना पुरविले गेले आहे.

Read More  ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला

 सॅनिटायझरच्या मागणीत चौपट वाढ
नेल्सन इंडियाच्या अहवालानुसार करोना मुळे सॅनिटायझरच्या मागणीत चौपट वाढ झाली आहे. २०१९ मध्ये या व्यवसायाची उलाढाल १० कोटींची होती, या मार्च अखेर ती ४५ कोटींवर गेली आहे. करोनाची लस अजून तयार नसल्याने ही उलाढाल अजून १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. करोना साथीमध्ये दर दोन तासानी हात धुण्याचा अथवा सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या