26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeउद्योगजगतलवकरच ड्रोनव्दारे होणार लस आणि पिझ्झा डिलिव्हरी

लवकरच ड्रोनव्दारे होणार लस आणि पिझ्झा डिलिव्हरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंन्सिंग अत्यावश्यक झाले असून, या अनुषंगाने देशात आगामी काही दिवसांत ड्रोनव्दारे होणार लस, पिझ्झा आणि इतर महत्वाच्या वस्तुंचा पुरवठा करण्यात येणार आहे़ याकरीता नागरी उड्डाण मंत्रालयाने तशाप्रकारची परवानगी सुध्दा दिली आहे़ यामुळे सोशल डिस्टंन्सिंगही होणार आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा अडथळाही काही प्रमाणात कमी होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़

येत्या काही दिवसात पिझ्झापासून ते लसीपर्यंतची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होईल. नागरी उड्डाण मंत्रालयाने ७ कंपन्यांना ड्रोनचे लांब पल्ल्याचे प्रयोग करण्यासाठी संमती दिली आहे. यात फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा देखील समावेश आहे. स्विगी स्कायलार्कसोबत मिळून हा प्रयोग करणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यास वेळेची बचत होईल आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळेल असे सांगितले जात आहे.

मारूत ड्रोनटेकला बीव्हीएलओएसची परवानगी मिळाली आहे. ते तेलंगना सरकारसोबत मेडिकल सप्लाई डिलिव्हरीवर काम करत आहेत. कोविड दरम्यान देखील या कंपनीने बरेच काम केले आहे. यात त्यांचे जवळपास ५२ ड्रोन काम करत आहेत. मारूत ड्रोनटेकने लशीच्या वितरणासाठी इच्छा व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त अ‍ॅटो मायक्रोयूएएस, सेटींलियन नेटवर्क, व्हर्जीनाटेक या कंपन्यांनादेखील डीजीसीएची परवाणगी मिळाली आहे.

आतापर्यंत २० कंपन्यांना परवानगी
गेल्या वर्षी १३ कंपन्यांना ड्रोनने वितरण करण्याची परवाणगी मिळाली होती. या कंपनींना परवानगी देण्याआधी स्पाइसजेटच्या डिलिव्हरी विंग स्पाइस एक्स्प्रेसला डीजीसीएद्वारे परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण २० कंपन्यांना याप्रकरची परवानगी मिळाली आहे.

ड्रोनद्वारे होणार लसीची डिलिव्हरी
नागरी उड्डाण महानिदेशालयाने (डीजीसीए) स्पाइसजेट विमान कंपनीच्या कार्गो इकाइ स्पाइस एक्स्प्रेसला ड्रोनद्वारे इ-कॉमर्स पार्सल डिलिव्हरीची परवानगी मे महिन्यात दिली होती. डीजीसीएद्वारे देण्यात आलेल्या या परवानगीनंतर आता स्पाइसजेट ड्रोन च्या मदतीने इ-कॉमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि अन्य आवश्यक वस्तुंचे वितरण करेल.

काय आहे बीव्हीएलओएस?
ड्रोन इंडस्ट्रीमध्ये संशोधन करत आहेत, ज्यामुळे मानवरहित एरियल व्हिकल्सला अधिक दक्षतेने पोहोचवले जाईल. बीव्हीएलओएस फ्लाइट्सला विजुअल रेंजच्या पुढे देखील उडवले जाऊ शकते. सोबतच यामुळे ड्रोन्सला लांबचा पल्ला निर्धारित करण्यासाठीही मदत मिळेल. याचा वेगवेगळ्याप्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.

रायबरेलीतील ३५ नेत्यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या