31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home उद्योगजगत अ‍ॅपल कंपनीत कर्मचा-यांकडून तोडफोड

अ‍ॅपल कंपनीत कर्मचा-यांकडून तोडफोड

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : आयफोन कंपनीने तयार केलेल्या आयफोन मोबाईलच्या कारखान्याची कर्मचा-यांनीच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील अ‍ॅपल आयफोन बनवण्याच्या फॅक्टरीत तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे. हा कारखाना कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्रात आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचा-यांचा पगार थकवण्यात आला होता.

अनेक वेळा कर्मचा-यांनी विनंती करूनही पगार देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त कर्मचा-यांनी आयफोनच्या कारखान्याची तोडफोड केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तोडफोड करणा-यांना तिथून हटवलं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कंपनीकडून पगार नाही तर केवळ आश्वासने पदरात पडल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनंतर देखील कर्मचा-यांना पगार मिळाले नाहीत. वारंवार विनवणी करून देखील पगार न दिल्याच्या रागातून कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. कर्मचा-यांना अडवले आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे़ तर अ‍ॅपल कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

चीनला डावलून सॅमसंगची भारतात गुंतवणूक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या