16 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रव्यावसायिकाचा मित्राकडून खून

व्यावसायिकाचा मित्राकडून खून

गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद कारमधून बाहेर फेकून पळाले

पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपूरम ९० फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (३८, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बसून बोलत होते. त्याच वेळी वैयक्तिक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.

नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्या धक्क्याने निपचित पडलेले नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाच आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR