एमपीएससी आंदोलनप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनावर आता पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे. परवानगी रद्द झाल्यानंतरही बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभुळकर आणि साहेबराव क्षीरसागर या १५ जणांवर व त्यांच्या इतर सहका-यांवर गुन्हा नोंदवला आहे. परवानगी नसताना आंदोलन करणे, चिथावणीखोर वक्तव्ये करणे आणि वाहतुकीला अडथळा आणणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

परवानगी रद्द झालेली असतानाही आंदोलकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा नव्याने परवानगी न घेता पुन्हा आंदोलन सुरू केले. सलग आठ दिवस रस्ता अडवून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहतुकीचा मुक्त प्रवाह कायम ठेवणे ही राज्याची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी आंदोलकांना नोटीस बजावून आंदोलन मागे घेण्यास किंवा सुचविलेल्या पर्यायी जागेवर जाण्यास सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या या नोटिशीकडे दुर्लक्ष करून रस्ता अडवून आंदोलन सुरूच ठेवल्याने अखेर विविध कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर परवानगी झाली होती रद्द
विद्यार्थी प्रतिनिधींना एस. एम. जोशी पुलाजवळ २ ऑक्टोबर रोजी सशर्त आंदोलन करण्यासाठी २६ सप्टेंबरला परवानगी देण्यात आली होती. मात्र, ३० सप्टेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यानंतर प्रतिनिधींनी २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित करत असल्याचे लेखी पत्र पोलिस आयुक्तांना दिले होते, ज्यामुळे आंदोलनाची पूर्वीची परवानगी आपोआप रद्द झाली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news