पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणा-या ‘त्या’ ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल

पुणे : मिसिंग मुलीच्या शोधप्रकरणातून वादाला तोंड फुटून अखेर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पथकाने आणि कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना तपासासाठी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र, या मुलींवर कोथरूड पोलिसांनी मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेविरोधात मुलींनी आणि त्यांच्या सहका-यांनी पोलिस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आता या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सागर आल्हाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, अ‍ॅड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश भोलाने आणि अ‍ॅड. रेखा चौरे या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, २२१, २२३, ३२४(३) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) आणि ३७(३) अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणातील मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिसांनी बोलावले होते. मात्र, ठाण्यात नेऊन मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला. त्यानंतर त्या व त्यांच्या सहका-यांनी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ३ वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले.या आंदोलनात सुमारे ५० ते ६० जण सहभागी होते. श्वेता पाटील आणि परिक्रमा खोत यांच्यासह पीडितांनी कोथरूड पोलिसांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

पोलिसांनी या घटनेविषयी आंदोलनकर्त्यांना लेखी प्रतिपत्र दिले. त्यात संपूर्ण घटना इनडोअर घडली असल्याचे नमूद केले गेले असून अ‍ॅट्रॉसिटीचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे नमूद होते. मात्र हे पत्र श्वेता पाटील यांनी संतप्त होऊन पोलिसांसमोरच फाडले. यानंतर दोन मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात मारहाणीच्या कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नसल्याचे स्पष्ट झाले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठ अधिका-यांचे न ऐकता सरकारी कामात अडथळा आणला, भडकावू घोषणा देऊन शांतता भंग केली, तसेच असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केले, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनाला आमदार रोहित पवार, तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news