16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeमहाराष्ट्रवस्ती, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

वस्ती, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

सरकारने निश्चित केली कार्यपद्धती शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी
ग्रामविकास विभागाने राज्याच्या ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधित गावाला ग्रामसभेत तसा ठराव करून तो गटविकास अधिका-याला सादर करावा लागणार आहे. या प्रस्तवावर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत.

शहरी आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची तसेच रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची, लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. गावाचे नाव बदलण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जातीवाचक नाव बदलून नवे नाव देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिका-यांना असल्याचे गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

प्रस्ताव संबंधीत जिल्हाधिका-यांकडे सादर करा
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जातीवाचक नावे बदलण्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे. त्यानुसार एखाद्या वस्तीचे वा रस्त्याचे जातीवाचक नाव बदलायचे झाल्यास संबंधित गावाने ग्रामसभेत तसा ठराव करून त्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिका-यांना सादर करावा. गट विकास अधिकारी यांनी प्रस्ताव तपासून तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा प्रस्ताव तपासून संबंधित जिल्हाधिका-यांकडे सादर करावा आणि जिल्हाधिका-यांनी प्रस्तवाला मंजुरी द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR