21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयविमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी

विमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी

डीजीसीएने नवे नियम जारी केले

मुंबई : काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे मोबाइल चार्जिंग करताना आग लागल्याची घटना घडल्या होत्या. याची दखल आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत.

नोव्हेंबर २०२५ मध्ये डीजीसीएने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, विमानाच्या आत नेऊ शकणा-या हँडबॅगमध्ये पॉवर बँक नेण्यास अनुमती दिली होती. मात्र, ती बॅग विमानामध्ये असलेल्या वरील कप्प्यात ठेवण्यास अनुमती दिली नव्हती. कारण वरील सामानात जर बँटरीमध्ये काही समस्या निर्माण झाली आणि आग लागल्यास धोकादायक ठरू शकते असे डीजीसीएने नमूद केले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी विमानात चार्जिंगदरम्यान आग लागली होती. त्यानंतर डीजीसीएने या प्रकरणाचा सखोल तपास करत यापुढे विमानामध्ये पॉवर बँकद्वारे चार्जिंगला बंदी घातली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR