चारठाणा : देवगावफाटा येथील करपरा नदीच्या पुलावर एका कारमध्ये गुटखा येत असल्याच्या माहितीवरून चारठाणा पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता कारवाई करीत ७ लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत डस्टर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारठाणा पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी देवगाव फाटा परिसरातच एका दुचाकीस्वारांकडून २१ हजार रुपयांचा अवैध गुटखा व दुचाकी जप्त केली. सध्या जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून ठीकठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गुटखा जप्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चारठाणा परिसरात ९ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता देवगावफाट्या जवळ पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, सुनील वसलवार, शेख जीलानी यांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ३७ हजारांचा गुटक्यासह मुद्देमाल जप केला. देवगाव फाट्या जवळ करपरा नदीच्या पुलाजवळ एका डस्टर कारमधून गुप्तपणे नेत असलेल्या गूटक्यावर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.
कार मध्ये प्रेमियम राज निवास गुटखा ३ लाख १७ हजार रुपयांचा आढळला व ३ लाख ५० हजार रुपयांची डस्टर कार असा एकुण ६ लाख ७६ हाजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. जमादार सुनिल वसलवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीपराव देशमुख रा.वसा तालुका जिंतूर यांच्या विरुद्ध चारठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड हे करीत आहेत.