‘चॅटजीपीटी’चा ‘डॉटस्’ आता तुमच्यासाठी काम करणार

न्यूयॉर्क : आतापर्यंत आपण एखादा कामासंदर्भात प्रश्न पडल्यास तो प्रश्न एआयला विचारायचो, त्याचे उत्तर घ्यायचे आणि पुढचे काम पुन्हा त्याला सांगायचे पण आता हे चित्र बदलणार आहे. ओपनएआयने असा एआय एजंट सादर केला आहे, जो एकदा काम सोपवल्यानंतर पुढची अनेक पावले स्वत: ठरवून काम सुरू ठेवू शकतो. या नव्या एआय एजंटचं नाव आहे ‘डॉट्स’.

‘डॉट्स’ची खासियत म्हणजे त्याला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कमांड देत बसण्याची गरज नाही. तुम्ही त्याला एखादे काम सांगितले की, ते पूर्ण करण्यासाठी पुढे काय करायचे, कोणती माहिती शोधायची आणि कोणत्या टप्प्यावर पुढे जायचे, हे तो स्वत: ठरवू शकतो. विशेष म्हणजे, ओपन एआयच्या माहितीनुसार प्रत्येक ‘डॉट’ला स्वत:चा क्लाउड कॉम्प्युटर आणि ब्राउझर मिळतो. त्यामुळे तो विविध वेबसाइट्स आणि कनेक्टेड अ‍ॅप्सचा वापर करून एखाद्या प्रोजेक्टवर काम करू शकतो. एवढेच नाही, तर तुम्ही चॅटजीपीटी बंद केले तरी ‘डॉट्स’ बॅकग्राउंडमध्ये काम सुरू ठेवू शकतो.

समजा, तुम्ही एखाद्या रिपोर्टसाठी सतत बदलणा-या आकडेवारीवर काम करत आहात. अशावेळी ‘डॉट्स’ नवीन माहिती तपासू शकतो, उपलब्ध डेटाचे विश्लेषण करू शकतो आणि रिपोर्टमधील माहिती अपडेट करू शकतो. मात्र, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी तुमची मंजुरी आवश्यक असेल, तर तो तिथे थांबून तुमच्याशी संपर्क साधेल. कंटेंट क्रिएटर्ससाठीही हा एआय एजंट कामाचा ठरू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या मुलाखतीची ट्रान्सक्रिप्ट दिल्यानंतर त्यातून महत्त्वाचे मुद्दे शोधणे, शो नोट्स तयार करणे आणि सोशल मीडिया पोस्टचे ड्राफ्ट बनवणे अशी कामं ‘डॉट्स’ करू शकतो.

४ हजारांहून अधिक अ‍ॅप्सशी जोडण्याची क्षमता
ओपनएआयच्या म्हणण्यानुसार, ‘डॉट्स’ला ४ हजारांहून अधिक अ‍ॅप्सशी जोडण्याची क्षमता आहे. कोणत्या अ‍ॅप्सना प्रवेश द्यायचा आणि कोणत्या प्रकारच्या परवानग्या द्यायच्या, हे यूजर ठरवू शकतो. संवेदनशील कामांसाठी यूजरची मंजुरी घेण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे. याशिवाय ‘कस्टम रुल्स’च्या माध्यमातून ‘डॉट्स’ने कशाप्रकारे काम करावे याचे नियमही यूजर ठरवू शकतो.

‘एआय’चा वेग वाढला
मेटाच्या ‘मुसे’ एआय एजंटनंतर आता ओपन एआयने ‘डॉट्स’ मैदानात उतरवल्याने एआयच्या शर्यतीला नवा ट्विस्ट मिळाला आहे. आतापर्यंत कोण चांगले उत्तर देते? यावरून सुरू असलेली स्पर्धा आता कोण तुमचे काम करून देते? इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, एआय आता फक्त उत्तर देणारा साथीदार न राहता तुमच्या कामाचा ‘डिजिटल असिस्टंट’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news