21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयआग्रा-मुंबई महामार्गावर भरधाव वाहनाने चित्त्याला चिरडले

आग्रा-मुंबई महामार्गावर भरधाव वाहनाने चित्त्याला चिरडले

कुनोच्या जंगलातून बाहेर रस्त्यावर आले होते चित्ते

सिमरिया : आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (शिवपुरी लिंक रोड) घाटीगाव सिमरिया वळणावर कुनोमधून पळून गेलेल्या दोन चित्त्यांपैकी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. जंगलातून बाहेर पडून चित्ता रस्त्यावर आला असता, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला चिरडले.

ही घटना रविवारी सकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. माहिती मिळताच घाटीगाव पोलिस ठाण्याचे पोलिस आणि वन विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळ नियंत्रणात घेतले आहे. कुनोचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. चित्त्याचा मृतदेह कुनो येथे नेण्यात येत आहे, जिथे तज्ज्ञांचे पथक शवविच्छेदन करेल. उपग्रह कॉलर आयडीद्वारे चित्त्यांवर सतत लक्ष ठेवले जात होते. रस्त्यावर अपघात होताच अधिका-यांना माहिती मिळाली आहे. घटनास्थळी बरीच गर्दी होती, परंतु वन विभागाच्या अधिका-यांनी पोलिसांनाही जवळ येऊ दिले नाही. संपूर्ण कारवाई वन विभागाचे अधिकारी करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR