26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री प्रसारमाध्यमांवर चिडले

मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांवर चिडले

परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान

मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या एका विधानावर महायुतीत नवा वाद उफाळला. ‘शिवसेनेचा बाप मीच’ या फुके यांच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच विधानाबद्दल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी माध्यमांना खडेबोल सुनावले.

मुंबईत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री परिणय फुके यांनी केलेल्या विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असे आहे की, अलिकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणे आणि त्याच्यावर दिवस काढणे, हे आपण सुरू केलेले आहे; हे बंद करा. मला माहिती होत की तुम्ही हे विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी हे सांगितले की, कुठल्याही गोष्टीचे श्रेय आईला जाते आणि त्याच्यात काही चुकले तर बापावर केले जाते. भंडा-यामध्ये शिवसेनेचे लोक काहीही झाले की माझ्यावर टाकतात. त्याच्या मी बाप आहे का? अशा प्रकारचे आहे.

त्या विधानाचा असा त्याचा अर्थ होत नाही
ठीक आहे. हे वक्तव्य पूर्ण पार्श्वभूमीवर बघितले, तर… तसे बोलले पाहिजे, नाही बोलले पाहिजे हा त्यांचा विषय आहे. पण पूर्ण पार्श्वभूमीवर बघितले तर शिवसेनेचा मी बाप आहे, असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही. त्यामुळे अर्थवट वाक्ये कापायची आणि ती चालवायची हे बंद केले पाहिजे अशा शब्दात देवेंद्र्र फडणवीस यांनी माध्यमांचे कान टोचले.

परिणय फुकेंचे विधान काय?
भंडा-यामध्ये भाजपचा मेळावा पार पडला. मेळाव्यात बोलताना परिणय फुके म्हणाले, अनेकजण माझ्यावर आरोप करतात. मी आरोपांना उत्तर देत नाही. पण माझ्या लक्षात आले की, जर मुलगा परीक्षेत चांगले गुण मिळवत असेल, तर त्याचे नाही त्याच्या आईचे कौतुक केले जाते. मुलाने वाईट केले, तर त्याचा दोष बापाला दिला जातो. तेव्हा मला माहीत झाले की, शिवसेनेचा बाप मीच आहे. नेहमी खापर माझ्यावरच फोडले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR