30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस

मुख्यमंत्री शिंदेंनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

उल्हासनगरमध्ये काल रात्री राजकीय राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक केबिनमध्येच भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवक यांच्यात राडा झाला. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
या घटनेत जखमी झालेले शिवसेनेचे महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली. महेश गायकवाड हे व्हेंटिलेटवर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR