अण्णाभाऊ साठे पुतळा विटंबना प्रकरणी सिडको तणाव

नांदेड: प्रतिनिधी
सिडको येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची अज्ञात इसमाने विटंबना केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. यावरून सिडको परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद केली. त्या समाकंठकावर तात्काळ कारवाई करावी यासाठी ग्रामीण पोलिसांना सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अज्ञात समाजकंटकाने सिडको येथील पाण्याच्या टाकीच्या समोर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण-कृती पुतळ्याची विटंबना केल्याची माहिती शुक्रवारी सकाळी मिळताच पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांचा समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पुतळा परिसरामध्ये बराच वेळ गोंधळ घातला.संबंधित समाजकंटकाला तात्काळ अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल. निवेदनात असे नमूद केले आहे की अज्ञात समाजकंटकांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून समाजाचे मन दुखवले आहे.त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर पुतळा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. त्या ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा. आरोपीवर भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. संबंधित गुन्हेगारावर १९ सप्टेंबर पर्यंत गुन्हा नोंदवून अटक न केल्यास अण्णाभाऊ साठे चौक सिडको येथे मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनावर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.

सिडको परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून सिडको हडको परिसरात शुक्रवारी बाजारपेठ बंद होती. व्याप-यांनी बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. यादरम्यान काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर मोर्चा हडको येथे सभा घेऊन थांबविण्यात आला.या मोर्चाचे नियोजन काँग्रेसचे सिडको ब्लॉक कमेटी अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होत.े मोर्चासाठी खा. रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती लाभणार होती. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा थांबविण्यात आला. यावेळी कॉग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news