Homeमहाराष्ट्रकाँग्रेस-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

काँग्रेस-एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

अकोला : प्रतिनिधी
अकोला महापालिका निवडणुकीपासून काँग्रेस आणि ‘एमआयएम’च्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला राजकीय राड्याने आता उग्र रूप धारण केले आहे. अकोला शहरातील अकोट फैल भागात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये किरकोळ वादातून, समर्थकांमध्ये तुफान दंगल झाली.

हाणामारी, दगडफेक, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, यातील एकावर धारदार चाकूने वार झाला आहे. चाकूने वार झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला इथं काँग्रेस आणि ‘एमआयएम’मधील राजकीय वाद विकोपाला गेले आहेत. अकोट फैल भागात दोन्ही ‘एमआयएम’चे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून पुढे दोघांमध्ये झटापटी झाली. हाणामारी झाली. हाणामारी सुरू असतानाच, दोन्ही बाजूने दगडफेक झाली. दंगलसदृश परिस्थितीमुळे परिसरात पळापळ सुरू झाली. यातच दोन्ही बाजूने धारदार शस्त्र काढण्यात आली.

दगडफेकीत तब्बल, चार पेक्षा जास्त लोक जखमी झाले. चाकूच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. यानंतर परिस्थिती अधिक चिघळणार, तेवढ्यात पोलिसांनी तिथं धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

‘एमआयएम’ गृहीत धरले
‘एमआयएम’ आणि काँग्रेसचे नगरसेवकांमध्ये महापालिका निवडणुकीपासून अंतर्गत राजकीय धुसफूस वाढली आहे. अकोला महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ४१ चा आकडा हवा होता. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकजूट दाखवत होती. मात्र मतदानवेळी फक्त ३२ मते मिळाली.

काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने ‘एमआयएम’ला गृहीत धरले होते. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनी तटस्थ राहिले. भाजपकडे स्वत:चे ३८ नगरसेवक असतानाही त्यांनी मित्रपक्ष आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत ४५ मतांचा भक्कम आकडा गाठला. महापालिकेतील सत्ता स्थापनेपासून काँग्रेस अन् ‘एमआयएम’मध्ये सुरू झालेल्या राजकीय वाद अजून धुसफूसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR