27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeराष्ट्रीयपोलिस आणि शेतक-यांमध्ये झटापट

पोलिस आणि शेतक-यांमध्ये झटापट

अंबाला येथे रिंग रोडवरून तंबू हटवले अनेकांना ताब्यात घेतले राष्ट्रीय महामार्गावर गोंधळ

अंबाला : हरियाणातील अंबाला येथे शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. निर्माणाधीन रिंग रोड आणि अंबाला-शामली महामार्गावरून शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीसाठी शेतकरी १० दिवसांपासून धरणे धरून बसले होते. पोलिसांनी त्यांचे तंबू उपटून टाकले. तसेच अनेक शेतक-यांना ताब्यात घेतले.

संतप्त शेतकरी अंबाला-जगाधरी राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोहोचले. सध्या महामार्गावरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी रिंग रोडच्या मार्गावरून शेतक-यांनी टाकलेल्या खाटाही उचलून घेतल्या. धरणेस्थळ रिकामे करून पुन्हा काम सुरू केले. दुसरीकडे, शेतक-यांचे म्हणणे आहे की एनएचएआयसोबत चर्चा सुरू होती, परंतु समस्येवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. हा रिंग रोड बनल्याने त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता राहणार नाही. पावसाच्या पाण्याची निचरा होण्यातही अडचण येईल, ज्यामुळे पिकांचे नुकसान होईल. गुरुवारी ५ गावातील शेतक-यांना ठऌअक कडून कोणतेही आश्वासन न मिळाल्याने ते यंत्रांना घेराव घालत होते. यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आणि शेतक-यांमध्ये संघर्ष सुरू झाला. पोलिसांनी शेतक-यांना पांगवून बसमध्ये बसवायला सुरुवात केली होती.

सध्या, परिस्थिती तणावपूर्ण आहे. भारतीय किसान युनियन(चढूनी)चे अध्यक्ष गुरुनाम सिंग चढूनी घटनास्थळी पोहोचले आहेत. अंबाला कॅन्ट डीएसपी आणि एसडीएम यांच्यासोबत त्यांची सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतही चर्चा सुरू आहे. पोलिस शेतक-यांना राष्ट्रीय महामार्गावरून मागे हटण्यास मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अटकेत असलेल्या शेतक-यांना सोडून देण्यात आले आहे.

तोडगा न निघाल्याने शेतक-यांनी यंत्रसामग्रीला घेराव घातला अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनातून कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवारी शेतक-यांनी रिंग रोडच्या बांधकामात गुंतलेल्या यंत्रसामग्रीला घेराव घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून एनएचएआयने अंबा, महेशनगर आणि साहा पोलिस ठाण्यांतून पोलिसांना बोलावले. यानंतर पोलिसांनी शेतक-यांना पांगवण्यास सुरुवात केली. काही शेतक-यांना बसमध्ये बसवण्यात आले. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. यानंतर शेतकरी राष्ट्रीय महामार्गाकडे कूच करू लागले.

एनएचएआयने काम सुरू केले शेतक-यांचे आंदोलन हटवल्यानंतर एनएचएआयने येथे वेगाने काम सुरू केले. जानेवारीच्या दुस-या आठवड्यातही शेतक-यांनी रिंग रोडचे काम थांबवले होते. अधिकारी आंदोलन संपवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. रिंग रोड वेळेवर पूर्ण करण्याचा दबाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR