युती-आघाडीचा ‘घोळात घोळ’!

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ४८ तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घोडे अडलेलच आहे. महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोलणी सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी निवडणूक लढवत आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही एकमत न झाल्याने कुठे महायुतीत तर कुठे महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.

सध्या तरी मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेनेचे जवळपास ठरले आहे. काही जागांवर अद्याप बोलणी सुरु आहे. तर पुणे, ठाणे आणि वसई-विरारमध्ये दोन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मीरा भाईंदरमध्ये चर्चा थांबली आहे तर अमरावती, सोलापूरमध्ये महायुती फिस्कटली आहे. तर काही महापालिकेत अजूनही चर्चेचे गु-हाळ सुरूच आहे.

सोलापूर, अमरावतीत महायुतीत फूट
सोलापूर महापालिकेत दोन्ही पक्षामधील महायुती तुटली आहे. त्याठिकाणी एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली असल्याची घोषणा माजी मंत्री व शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली आहे. दोघांनाही ४५-४५ सामान जागा वाटून घेतल्या आहेत. तर अमरावतीत भाजप ४५ ते ५० जागांवर लढण्याच्या तयारीत असताना, शिंदे गट आणि राणांच्या ‘युवा स्वाभिमान’ पक्षाला किती जागा द्यायच्या, यावरून महायुती फिस्कटली आहे.

मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने ठाकरे बंधुंबरोबर युती केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे यूतीकडून १० जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ५२ जागांच्या मागणीचा प्रवास अखेर १० जागांवर येऊन संपला आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे.

आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी
पुण्यात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या बैठकीकडे पाठ फिरवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी या नेत्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली. यावर संजय राऊत यांनी कोणाची वाट पाहू नका पुढे जा अशी सूचना केल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस-ठाकरे गट ताकदीने लढू : काँग्रेस
आज सकाळपासून आम्ही निवडणुकीच्या बैठकीसाठी बसलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देखील निरोप दिले होते. ते दुपारी येणार होते पण अजून त्यांचे नेते आले नाहीत. तरीही काल ज्या जागा त्यांना ठेवल्या आहेत त्या आजही तशाच आहेत. १६५ जागांची आमची यादी तयार आहे. मी त्यांच्या सगळ्या नेत्यांना कॉल केला त्यांचे नेते फोन उचलत नाही आहे. कुणी आलं कुणी नाही आलं तरी आमची तयारी आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात ताकदीने लढू.

महायुती
मुंबईत
– भाजप-शिंदेसेनेचे
१५० जागांवर एकमत
– नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादी (अजित पवार)ला दणका
ठाणे
– भाजप-शिवसेना एकत्र राष्ट्रवादी स्वबळावर
नवी मुंबई
– गणेश नाईकांमुळे भाजप-शिवसेना युतीबाबत संभ्रम
पुणे
– दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून संभ्रम
– भाजपचा १२५ जागांचा दावा
नागपूर
– स्थानिक पातळीवर अद्यापही चर्चा सुरू

महाआघाडी
मुंबईत
– ठाकरे बंधुंची आघाडी निश्चित
– शरद पवारांची अनिश्चिती
– काँग्रेसची स्वबळाची तयारी
ठाणे
– ठाकरे बंधू एकत्र लढणार
नवी मुंबई
– मविआ-मनसेमध्ये प्राथमिक चर्चा
पुणे
– शरद पवार आणि काँग्रेसकडून मुलाखती सुरू
– ठाकरे-शिवसेना वेगवेगळी लढणार?
नागपूर
– पवार आणि ठाकरे सेनेपेक्षा काँगे्रस वरचढ

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news