मुंबई : मुंबईतील चेंबूर भागातील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) क्वॉर्टरमधील फ्लॅटमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या जबानीच्या आधारे चेंबूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६ (डी), ३२८ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.