शहरात कोम्बिंग ऑपरेशनची वचक

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध होणा-या गुन्ह्यांना आळा घालण्यासह सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ११ ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार झालेल्या या मोहिमेत ५५ अधिकारी आणि २१८ अंमलदार, तसेच आरसीपी पथक सहभागी झाले होते. या कारवाईत तडीपार, प्रस्तावित तडीपार, एमपीडीएतून सुटलेले गुन्हेगार, सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर तसेच पाहिजे व फरारी आरोपींची सखोल तपासणी करण्यात आली.

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ५५, ५६, ५७ मधील तडीपार व प्रस्तावित गुन्हेगार ३०, एमपीडीएतून सुटलेले ३३ आणि मालमत्ता व शरीराविरुद्धचे सराईत गुन्हेगार ८८, अशा एकूण १५१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. याशिवाय अवैध शस्त्र बाळगणा-यांवरही कारवाई करण्यात आली. आर्म्स अ‍ॅक्टनुसार ४ गुन्हे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार २ गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयीन कारवाईअंतर्गत २९ बीडब्ल्यू व ५ एनबीडब्ल्यू वॉरंट बजावण्यात आले, तर ५५ समन्सची बजावणी करण्यात आली.या विशेष मोहिमेत दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांमध्ये वजीराबाद, इतवारा, विमानतळ तसेच वजीराबाद, भाग्यनगर येथे २ अशाप्रकारे ६ आरोपींचा समावेश आहे.पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गुरव , सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच आरसीपी पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news