पुर्णा : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा आ. रत्नाकर गुट्टे यांचे खंदे समर्थक अनंतराव पारवे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल दि.१९ डिसेंबर रोजी पूर्णा शहरातील आ.गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. परभणी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल पारवे यांचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी पूर्णा यांच्यावतीने जंगी स्वागत करून फटाक्यांच्या आतिषबाजी व मिठाई वाटप करून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, नंदकुमार डाकोरे, लक्ष्मीकांत कदम, प्रशांत कापसे, दाजीबा भोसले, बळीरामजी कदम, सुभाष देसाई, बालाजी कदम विलास कदम, कपिल कदम, विश्वनाथ होळकर, माऊली कदम, गोविंद ठाकूर, अनंतराव बनसोडे, नारायण धवन, संजय अंभोरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.