30.1 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय मंत्री राणेंविरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन

केंद्रीय मंत्री राणेंविरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला आहे. याविरोधात काँग्रेसने मुंबईसह राज्यभर आंदोलन केले. मुजोर नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणे माफी मांगो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे, असे चारही शंकराचार्यांनी म्हटले आहे. भाजप व त्यांचे नेते आता शंकराचार्यांना उलट प्रश्न विचारून त्यांचे योगदान विचारत आहेत, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

देशभरात राम मंदिराचा उत्साह आहे. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिराच्या उद्घाटनावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शंकराचार्यांनी अर्धवट मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याने वातावरणात बदल झाल्याचं दिसून येतंय. त्यातच नारायण राणेंनी थेट शंकराचार्यांबद्दल विधान केल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे राणे यांच्यावर टीकास्त्र सुरू झाले. दरम्यान, कॉंग्रेसने आंदोलन करून राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR