Homeराष्ट्रीयकेरळात १० वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता

केरळात १० वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता

तीन राज्यांत ‘सत्ता’ बदल! तामिळनाडूत ‘टीव्हीके’चा ‘विजय’

कोलकाता/दिसपूर/पुदूचेरी/तिरुवनंतपुरम/चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवार दि. ४ मे रोजी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.

तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.

सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य
– पोटनिवडणुकीत इतिहास रचला
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत नवा रेकॉर्ड बनवला आहे. २४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे. दरम्यान पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले. बारामती पोटनिवडणुकीच्या २४ व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे.

राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. अक्षय कर्डिले यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. ११२५८७ मतांनी अक्षय कर्डीले विजयी झाले येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २७,५०६ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना ५६९० मते पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७२९९ मते मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये हिंसा उसळली
पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होतानाचे दिसताच तसेच मतमोजणी सुरु असतानाच प. बंगालमधील आसनसोलमध्ये मोठा राडा झाला असून सुरक्षा दलांनी हा राडा शमविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. या राड्यात टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम बंगाल निकाल
भाजप – १९५
तृणमूल काँग्रेस- ९२
डावे पक्ष- ०२
काँग्रेस – ०
इतर- ०२
एकूण जागा – २९३

तामिळनाडू
टीव्हीके -१०६
द्रमुक- ६८
अण्णाद्रमुक- ५८
इतर- ००
एकूण जागा – २३४

केरळ
काँग्रेस -१०४
डावी आघाडी – ३४
इतर – ०२
एकूण जागा -१४०

आसाम
भाजप – १००
काँग्रेस – २०
इतर – ६
एकूण जागा – १२६

पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- २२
काँग्रेस- ६
इतर- २
एकूण जागा – ३०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR