Homeराष्ट्रीयकाँग्रेस २८ विधानसभा जागांवर लढणार

काँग्रेस २८ विधानसभा जागांवर लढणार

तामिळनाडू निवडणुकीसाठी डीएमके-काँग्रेसमध्ये जागावाटप

चेन्नई : तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. डीएमकेने काँग्रेसला २८ जागा दिल्या आहेत. याशिवाय पक्षाला एक राज्यसभा जागाही देण्यात आली आहे.

पक्ष नेत्यांनुसार, हा निर्णय बुधवारी डीएमके अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मागील निवडणुकीत काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी आगामी एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने १३३ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला १८ जागा मिळाल्या होत्या. डीएमकेच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सने एकूण १५९ जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, एनडीएला ७५ जागा मिळाल्या होत्या, ज्यात एआयएडीएमके ६६ जागांसह आघाडीतील सर्वात मोठा पक्ष होता.

आघाडी तुटण्याच्या मार्गावर होती
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी स्टालिन यांची भेट घेतली. पक्षाच्या सूत्रांनुसार, काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील २००४ पासूनची युती तुटण्याच्या मार्गावर होती. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी स्टालिन यांची भेट घेतली आणि दीर्घ चर्चेनंतर तोडगा निघाला. काँग्रेसने जागांची संख्या वाढवण्यावर भर दिला होता. जेव्हा चर्चा निष्फळ ठरली, तेव्हा चिदंबरम यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले. स्टालिन काँग्रेसला केवळ २५ जागा देऊ इच्छित होते, परंतु चिदंबरम यांच्या स्टालिन भेटीनंतर २८ जागांवर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR