माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

नाशिक : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हाके यांच्या अडचणी वाढल्या असून ओबीसी समाजातच फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, माझा हा व्हीडीओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचे हाके यांनी म्हटले. सध्या ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आले आहे, ही माळी समाजाची पोटदुखी आहे. भुजबळांनी कोणाला मोठे होऊ दिले नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य करताना लक्ष्मण हाके यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या व्हीडीओमुळे हाकेंवर आता माळी समाजातून टीका होत असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, हाकेंनी हा व्हीडीओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, मंत्री छगन भुजबळ यांनीही हाकेंनी दोन-तीन वेळा आपल्याला फोन केल्याचेही सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या गतीमानतेला ब्रेक देण्यासाठी पुढे आलेला ओबीसी चेहरा म्हणून लक्ष्मण हाकेंकडे पाहिले गेले. हाकेंनी सातत्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका करत ओबीसी समाजाची भूमिका मांडली. मात्र, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओमुळे ओबीसी एकजूट चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हीडीओनंतर हाके यांनी तात्काळ खुलासा करत हा व्हीडीओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचा दावा केला आहे. माझा व्हायरल झालेला व्हीडीओ म्हणजे ओबीसीमध्ये फुट पाडण्याचा हा प्लॅन आहे, याला कोणत्याही ओबीसी बांधवांनी बळी पडू नये असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

एआयचा वापर करून व्हीडीओ बनवला : हाके
एआयचा वापर करुन तो व्हीडीओ बनवला गेला असून मी काय आहे हे सर्व ओबीसी समाजाला माहित आहे. भुजबळ साहेबांसोबत माझे सकाळीच बोलणे झाले असून मला मॉरल सपोर्ट मिळाला आहे. मी छगन भुजबळ यांना आदर्श मानतो, माझं आणि भुजबळ साहेबांचे काय नाते आहे, हे भुजबळ साहेबांना माहीत आहे अशी माहितीही लक्ष्मण हाकेंनी दिली.

ओबीसी दुभंगणार नाही
असे फेक व्हिडिवो पसरवून ओबीसी दुभंगणार नाहीत, दोन चार विघ्नसंतोषी लोकं आहेत. मी याबाबत डिपार्टमेंटशी बोललो, वेळ पडली तर त्या चार लोकांबाबत प्रेस घेईन असेही हाकेंनी म्हटले आहे. मी चूक केली नाही, माफी मागायचा प्रश्न नाही. नवनाथ वाघमारे हे माझे सहकारी आहेत, पण काहीं गैरसमज झाला असेल तर त्यांच्याशी मी बोलेन असे स्पष्टीकरणही हाकेंनी दिले. तसेच, आमच्यात काही तरी भांडणं लावून ही लढाई कोण पाहत असेल तर ते सहन केल जाणार नाही, असा इशाराही हाकेंनी दिला आहे.

हाके खुलासा करणार : मंत्री भुजबळ
लक्ष्मण हाके यांचे सकाळपासून दोन-तीनवेळा फोन आले होते, काही गैरसमज झाला असे ते म्हणाले आहेत. याबाबत, हाके खुलासा करणार आहेत. त्यामुळे, यावर कोणी प्रतिक्रिया देऊ नये, असे मी इतरांना सांगितल्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हाकेंच्या व्हायरल व्हीडीओत काय?
सध्या ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आले आहे, ही माळी समाजाची पोटदुखी आहे. भुजबळांनी कोणाला मोठे होऊ दिले नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य करताना लक्ष्मण हाके यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news