रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद

कोल्लम : केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणे म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचे चित्र रेखाटण्यात आले होते.

मंदिर समितीने सांगितले की, या रांगोळीमधून आरएसएसचा झेंडा आणि ऑपरेशन सिंदूरचे नाव तयार करणे म्हणजे मंदिर परिसरात तिरंगा किंवा अन्य कुठल्याही सजावटीला देण्यात आलेल्या स्थगितीविरोधातील कृती आहे. हे निर्बंध २०२३ साली सातत्याने होणा-या राजकीय वादानंतर उच्च न्यायालयाने लागू केले होते.

मंदिर समितीचे सदस्य मोहनन यांनी याबाबत की, सण उत्सवांवेळी झेंड्यावरून सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे मंदिराच्या आसपास कुठलाही झेंडा किंवा सजावट करण्यात येऊ नये, असे आदेश आम्ही न्यायालयाकडून आणले होते असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मंदिर समितीने केलेल्या फुलांच्या सजावटीजवळच वेगळ्या रांगोळीच्या माध्यमातून आपला भगवा झेंडा आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव काढले होते. हे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन असल्याने आम्ही याबाबत तक्रार दिली. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा पूर्णपणे सन्मान करतो. मात्र आरोपी दाखवताहेत तसे हे प्रकरण नाही आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news